Absconding Accused Arrested: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २६ वर्षांनी जेरबंद; नाव बदलून पवनानगरमध्ये राहत होता

चाकणमधील २००० च्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडले; तांत्रिक विश्लेषणातून शोध
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २६ वर्षांपासून फरार असणाऱ्या एका मोस्ट वाँटेड आरोपीच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपी नाव बदलून पवनानगर भागात लपून राहिला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली.

Arrested
Pimpri Chinchwad BRTS Cleaning: पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी बॅरिकेड्सच्या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर

३० जुलै २००० रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास मौजे सोळबंद आंबेठाण (ता. खेड, जि. पुणे) येथे आरोपी निवृत्ती दौलत जाधव (वय ३१, रा. सोळबंद आंबेठाण) याने आपल्या राहत्या घरी मामी (सासू) लक्ष्मीबाई वाघमारे यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर आरोपी निवृत्ती जाधव हा गेल्या २६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.

Arrested
Pune Graduate Constituency Election: स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी वडगावमध्ये निर्धार

तांत्रिक विश्लेषण अन् शिताफीने कारवाई

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निवृत्ती दौलत जाधव हा आंबेगाव (पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) येथे राहत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोसई नाथा केकाण, पोलिस हवालदार प्रशांत तुरे आणि पोलिस नाईक/शिपाई मनोज मोरे यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. आरोपी हा स्वतःचे अस्तित्व, नाव व पत्ता बदलून अत्यंत चलाखीने राहत होता. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अथक परिश्रम घेऊन सापळा रचत त्यास शिताफिने ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

Arrested
Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उप-अधीक्षक भूषण माने आणि सहा. पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धडक कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलिस हवालदार जय पवार, प्रशांत तुरे, प्रणयकुमार उकिर्डे, पोलिस शिपाई मनोज मोरे आणि होमगार्ड भीमराव वाळुंज यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Arrested
Diwali Faral Parcel Abroad: परदेशात पाठवा घरगुती दिवाळी फराळ; टपाल विभागाची विशेष सुविधा सुरू

विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांची चक्रे वेगाने

राज्यात फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधार्थ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उप-अधीक्षक भूषण माने आणि महिला सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन तो लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबत पोलिसांच्या पथकाला विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news