Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती

आमदार प्रसाद लाड यांच्याकडून प्रचाराचा आढावा; बूथस्तरावर काम करण्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निर्देश
Pune Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पुणे पदवीधर मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचाराचा आढावा भाजपचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी, आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी (दि.१८) घेतला. स्थानिक भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवक, मंडलाध्यक्ष, बूथप्रमुखांसह डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटट आघाडीची त्यांनी बैठक घेतली. युवा मोर्चा मेळावा घेत त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. स्मिता योगेश जाधव मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. या बैठकीस सहप्रभारी आमदार स्नेहा दुबे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि पिंपरी-चिंचवड शिक्षक मतदारसंघ निवडणूक संयोजक सदाशिव खाडे आदी उपस्थित होेते.

Pune Graduate Constituency Election
Diwali Faral Parcel Abroad: परदेशात पाठवा घरगुती दिवाळी फराळ; टपाल विभागाची विशेष सुविधा सुरू

आमदार लाड म्हणाले की, पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातमध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ असा अभ्यास आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध बदलांसह पदवीधरांसाठी त्या निश्चितपणे मोठे काम करतील व पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pune Graduate Constituency Election
YCM Hospital Doctor Suspended: वायसीएम रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टर निलंबित; आयुक्तांचे विभागीय चौकशीचे आदेश

त्यांनी शहरात ठिकठिकाणी मध्यवर्ती बैठका घेतल्या. युवा मोर्चा संमेलनात मार्गदर्शन केले. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटट या आघाडीची बैठक घेतली. बूथ प्रमुखांची बैठक घेत दुसर्‍या व तिसर्‍या टप्यातील कामाची माहिती घेतली. भाजप युवा मोर्चा मेळावा घेत त्यांना मार्गदर्शन केले. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सेवा संकल्प अभियानाचा समारोपात उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी प्रयत्न करावेत. मंडलध्यक्ष व बूथ प्रमुखांनी तसे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Pune Graduate Constituency Election
Pimpri Chinchwad Property Tax Recovery: पिंपरी-चिंचवडमध्ये थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करा; अतिरिक्त आयुक्तांचे सक्त आदेश

या वेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर गांभीर्याने काम करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यावर भर दिला जावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

Pune Graduate Constituency Election
Lonavala Knife Attack: लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

या बैठकीस पक्षाचे सरचिटणीस मोरेश्वर शेंडगे, सरचिटणीस सोनाली हिंगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, पिंपरी- चिंचवड शिक्षक व पदवीधर निवडणूक संयोजक राजेश पिल्ले, सर्व निवासी पदाधिकारी तसेच पिंपरी विधानसभेतील मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, अनिता वाळुंजकर, जयदीप खापरे, मंगेश धाडगे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार नोंदणी वाढवणे, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि प्रचाराची प्रभावी आखणी करणे या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीचे आयोजन युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, सरचिटणीस राहुल खाडे, प्रदेश सचिव सुमित घाटे, दिनेश काटे, गणेश सस्ते, साची दोशी, प्रसाद कस्पटे, राजेश डोंगरे, अजित कुलथे, सम्यक साबळे यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news