Pune Graduate Constituency Election: स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी वडगावमध्ये निर्धार

आमदार संजय केळकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत पदवीधर व शिक्षक मतदारांची बैठक
Pune Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: पुणे विभाग पदविधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच इंद्रायणी महाविद्यालय संस्थेतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या आज झालेल्या बैठकीत पदवीधर उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

Pune Graduate Constituency Election
Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती

वडगाव मावळ येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये ठाणे शहराचे आमदार संजय केळकर आणि माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या वेळी पदवीधर व शिक्षक निवडणुकीचे मावळ प्रभारी तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे, उद्योजक रामदास काकडे, मावळ भाजपा प्रभारी गुलाबराव म्हाळस्कर, अंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, उत्तर रायगड सोशल मीडिया संयोजक व प्रभारी सुशील शर्मा, सागर शिंदे आणि गणेश ठोंबरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शिक्षक व पदवीधर मतदार उपस्थित होते.

Pune Graduate Constituency Election
Diwali Faral Parcel Abroad: परदेशात पाठवा घरगुती दिवाळी फराळ; टपाल विभागाची विशेष सुविधा सुरू

या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद साधत निवडणुकीच्या अनुषंगाने विचारविनिमय केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Pune Graduate Constituency Election
YCM Hospital Doctor Suspended: वायसीएम रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टर निलंबित; आयुक्तांचे विभागीय चौकशीचे आदेश

मतदारांशी थेट संवाद साधत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ देण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला. सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले. दरम्यान, तळेगाव दाभाडे येथील बालविकास विद्यालय, आदर्श विद्या मंदिर या शाळांमध्ये बैठक घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news