Pimpri Chinchwad BRTS Cleaning: पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी बॅरिकेड्सच्या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर

पिण्याच्या पाण्याचा वापर नसल्याचा महापालिकेचा दावा; पाणीबचत करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करणार
Pimpri Chinchwad BRTS Cleaning
Pimpri Chinchwad BRTS CleaningPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील बीआरटीएस बॅरिकेड्स आणि दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रांत (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाही.

Pimpri Chinchwad BRTS Cleaning
Pune Graduate Constituency Election: स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी वडगावमध्ये निर्धार

पावसाळ्यामुळे रस्त्यावरील चिखल, माती व धूळ बॅरिकेड्स व दुभाजकांवर साचल्याने ते वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावेत म्हणून रस्ते सुरक्षेसाठी हे काम केले जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. बीआरटी बॅरिकेड्सला स्कूल बसची धडक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेड्स व दुभाजकांची दृश्यता कायम ठेवणे. संभाव्य धोकादायक ठिकाणांची स्वच्छता करणे, हे उपाय महापालिका करीत आहे.

Pimpri Chinchwad BRTS Cleaning
Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती

जानेवारी 2027 मध्ये होणार्‍या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीसोबत नियमित देखभालीलाही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी बीआरटी मार्गांची स्वच्छता व देखभाल करण्यात येत आहे. बॅरिकेड्स व दुभाजकांची स्वच्छता ही केवळ स्पर्धेपुरती किंवा शहराच्या सुशोभीकरणापुरती मर्यादित नाही.

Pimpri Chinchwad BRTS Cleaning
Diwali Faral Parcel Abroad: परदेशात पाठवा घरगुती दिवाळी फराळ; टपाल विभागाची विशेष सुविधा सुरू

दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक व इतर वाहनचालकांसाठी रस्त्यावरील संरक्षकव्यवस्था स्पष्टपणे दिसणे, हा उद्देश आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दुष्काळ परिस्थिती आणि पाणीकपात तसेच रस्त्यांची आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेची कामेही करणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबींचा विचार करून महापालिका एसटीपीत प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करीत आहे.

Pimpri Chinchwad BRTS Cleaning
YCM Hospital Doctor Suspended: वायसीएम रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टर निलंबित; आयुक्तांचे विभागीय चौकशीचे आदेश

पाणीबचत, पुनर्वापर करणार्‍यांचा होणार सन्मान

शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, हाैसिंग सोसायट्या या पाणीटंचाई व त्यावरील आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. पाणी बचत तसेच पाण्याचा पुनर्वापर करणार्‍या हाैसिंग सोसायट्यांना महापालिका सन्मानित करणार आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळा

नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. महापालिकेच्या स्वच्छता व रस्ते सुरक्षिततेच्या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news