लग्न कर नाही तर, औषध पिऊन जीवच देतो; ब्रेकअप झालेल्या प्रियकराची तरुणीला धमकी

लग्न कर नाही तर, औषध पिऊन जीवच देतो; ब्रेकअप झालेल्या प्रियकराची तरुणीला धमकी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुलीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केल्यानंतर तीने त्याच्याशी असलेले प्रेम संबंध तोडून टाकले. तुझे लग्नच होऊ देणार नाही, माझ्याशी लग्न कर नाही तर औषध पिऊन जीवच देतो, अशी धमकी ब्रेकअप झालेल्या तरुणाने दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विष्णु विठ्ठल शिंदे ( वय २३ , रा. भोगलवाडी, जि. बीड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तर याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णु मुंडे याचे २० वर्षीय फिर्यादी तरूणीबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु, विष्णु याने तरूणीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केल्याने तिने त्यांच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. पीडित तरुणी तिच्या बहिणीच्या घरी राहत असताना विष्णुने तिचा पाठलाग केला. माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तिला दिली.

तसेच तू लग्नच कसे करतेस बघतोच, असे बोलून तिच्या बहिणीला शिवीगाळ केली. तिने लग्न न केल्यास औषध पिऊन जीव देण्याची धमकी त्याने तरुणीला दिली. याप्रकरणी तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेवून त्याच्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news