आरोग्य भरती पेपरफुटी : 'न्यासा' कंपनीचादेखील सहभाग | पुढारी

आरोग्य भरती पेपरफुटी : 'न्यासा' कंपनीचादेखील सहभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागाचा २४ तारखेला झालेला टगट- क’चा पेपरही फुटला होता. (आरोग्य भरती पेपरफुटी) त्यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी देखील सहभागी असल्याचे समोर आले आहे. ‘गट-ड’चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे या दोघांच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. (आरोग्य भरती पेपरफुटी) संशयित आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे.

गट कचा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. निशिद गायकवाड आणि राहुल लिघोट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत होते. यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी पेपर प्रिंट करतेवेळी तो फोडला होता. त्यातूनच हा प्रकार समोर आला आहे.

सध्या राज्यभर अनेक पेपरफुटीची प्रकरणे गाजत आहेत. अशात आरोग्य भरती पेपरफुटीप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच गट ‘क’ चा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी २ एजंटना पोलिसांनी अटक केली आहे.

न्यासा कंपनीने जिथून पेपर प्रिंट केला, तेथूनच तो दलालांना पुरविला गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यावरून २ एजंटना अटक करण्यात आली आहे.पेपरफुटीप्रकरणी निशाद गायकवाड आणि राहुल लिंघोट या दोन आरोपींना अटक केली आहे. या एजंटनी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे.

जवळपास ६ कोटींची मालमत्ताही जप्त

यामुळे आता आरोग्य भरती गट क परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास ६ कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Back to top button