‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ’ चा आज शेवटचा दिवस - पुढारी

‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ’ चा आज शेवटचा दिवस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: हौशी कोल्हापूरकरांना फॅशनच्या कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरिफायरसारख्या होम अ‍ॅप्लायन्सेसपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरीजपर्यंत, चटपटीत खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंत, अशा वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीसह लज्जतदार मेजवानीचा मनसोक्त आनंद देणार्‍या दै. ‘पुढारी’ आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलने उत्सवाच्या यशस्वितेची मोहर सोमवारी उमटवली.

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ.एम., कस्तुरी क्लबतर्फे फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राऊंड येथे चार दिवसांपासून रंगणार्‍या या उत्सवात प्रल्हाद पाटील व विक्रम पाटील यांच्या मराठी हिटस् कार्यक्रमातून बहारदार जुन्या-नव्या मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘तुझ्या रूपाचं चांदनं – गरिबाघरी सौंदर्य हे पाप’ या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी प्रदर्शनाला भेट दिली. या मालिकेत नक्षी म्हणजे नक्षत्रा आणि दत्ता हे पात्र साकारणार्‍या कलाकारांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांची मने जिंकली.

फेस्टिव्हलमध्ये ताणतणावाच्या जीवनशैलीत डायट फूड, सेंद्रिय धान्य, स्वच्छ पाणी, आयुर्वेदिक, औषधी, नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य देणार्‍या चोखंदळ ग्राहकांची आवड-निवड आणि त्यांच्या बजेटचा विचार करून स्टॉल मांडण्यात आले आहेत. लघू उद्योजकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या विविध ब—ँडस्च्या आकर्षक वस्तू या उत्सवात पाहायला आणि खरेदी करायला मिळतात. एकाच छताखाली अख्ख्या कुटुंबाच्या खरेदीचा आनंद देणारा हा उत्सव कोल्हापूरकरांमधील खवय्येगिरीलाही तृप्त करणारा आहे.

मुलांच्या खेळण्यांपासून, तरुणाईसाठी दुचाकी, चारचाकी गाड्या, अ‍ॅक्सेसरीज, तरुणींसाठी नव्या ट्रेंडचे कपडे, बांगड्या, मोत्याचे दागिने, आयुर्वेद, पंचकर्म, बिस्किटे, फॅशनचे चप्पल, शूज, थेंडिंग ज्वेलरी, आवडत्या डिझायनर साड्या, गृहसजावटीच्या वस्तू, फर्निचर, पडदे, कव्हर, महिलांचे काम हलके करणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक गॅजेटस्, फायनान्स, सौंदर्य, शेंगदाणा चटणीसह चटण्यांचे विविध प्रकार, घरी बनविलेली चॉकलेट, तिळाचे लाडू, विविध प्रकारची पिठे, सर्वप्रकारची लोणची, खाकरा, फॅशन आणि लाईफ स्टाईल अशा सर्वप्रकारच्या सेवा व वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले.

प्रल्हाद-विक्रम यांचा आज हिटस् बिटस्

दै. ‘पुढारी’ आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस असून, सायंकाळी 6 वाजता प्रल्?हाद-वि—कम आयोजित हिटस् बिटस् हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच फेस्टिव्हलमध्ये अ‍ॅपल सरस्?वती हॉस्पिटल यांच्?या सहकार्यातून सकाळी 11 ते 3 या वेळेत कोरोना प्रतिबंधक लस मोफत घेता येणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button