पुणे : राज्य राखीव पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार | पुढारी

पुणे : राज्य राखीव पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार

दौंड : पुढारी वृत्तसेवा

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात येथे कुसडगाव येथील गट क्रमांक 19 ची पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी प्रक्रिया शुक्रवारी (दि. 24) सुरू होती. त्यावेळी उमेदवारांचे कागदपत्र तपासत असताना प्रकाश बाळू त्रिभुवन (वय 27, रा. नालेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) या विद्यार्थ्याने त्याच्या जागी डमी उमेदवार पाठवला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : ई-बाईकसाठी महापालिका उभारणार 500 चार्जिंग स्टेशन

प्रकाश त्रिभुवन याने लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक मैदानी चाचणीकरिता शुक्रवारी दौंड येथे गजानन किसन ठाकूर (रा. नलिनी, ता. भोकरदन, जि. जालना) या त्याच्या सहकाऱ्याला पाठविले. मात्र आवेदनपत्रावर संशय आल्याने या प्रकरणाची तपासणी केली असता हे बिंग उघड झाले. यावरून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातचे पोलीस निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तपास पोलीस हवालदार भरत जाधव करत आहेत.

हेही वाचा

पुणे : शेल पिंपळगावातील खूनप्रकरणी चौघांवर गुन्हा; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे : एसटी कार्यालयात दारूच्या बाटल्या प्रकरणी चन्ने यांचे चौकशीचे आदेश

पुणे : हवेली तहसील मधील संशयित प्रकरणांच्या फेरसुनावणीची मागणी

पुणे : बोगस भरती प्रकरणातील मोठे मासे अद्याप मोकाटच!

Ram Mandir Land Scam : आयोध्येतील राम मंदिर जागा खरेदीत घोटाळा

ajit pawar : शेतकऱ्यांना सानुग्रह देण्यापासून आम्ही पळ काढणार नाही, आमदार अबिटकरांना उपमुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

 

Back to top button