

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर कोरोना रुग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे महापालिकेचे बाळकूम येथे ग्लोबल कोरोना रुग्णालय आहे. वर्षभरापूर्वी या रुग्णालयात पीडित तरुणीची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती करण्यात आली होती.
त्यावेळी उपायुक्त केळकर यांच्याकडे कोरोना रुग्णालयाचा पदभार होता.
अधिक वाचा :
काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काम करत असताना केळकर यांनी विनयभंग केल्याचा आरोप पीडित तरुणीने महापालिका प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केला.
कागदपत्र अपूर्ण असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने तरुणीला कामावरून काढले. याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना मिळाली.
बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांची भेट घेतली. विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
केळकर यांच्याविरोधातील कारवाईला वेग आला.
अधिक वाचा :
बुधवारी सायंकाळी पीडित तरुणीने कापूरबावडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती.
पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले. दुसरीकडे जी विशाखा कमिटी नेमली आहे. ती कमिटीदेखील डॉ विश्वनाथ केळकर यांनी नेमली आहे.
अधिक वाचा :
विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी याची दखल घेतली नाही.
जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत", असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="7246"]