नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्ट शब्दात खुलासा केला आहे.
एका टीव्ही चॅनेलशी झालेल्या विशेष संभाषणात शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या बातम्यांना खोडून काढले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.
अधिक वाचा
मंगळवारी किशोर यांनी राजधानी दिल्लीतील खासदार निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर निवडणुकांवर नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची चर्चा सुरु झाली.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की, या संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व बातम्यांना बिनबुडाचे वर्णन करीत ते म्हणाले की, आता राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत नाही.
अधिक वाचा
या विषयावर आम्ही आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याबरोबर किंवा अन्य नेत्याशी चर्चा केलेली नाही. जर कोणी पवार साहेबांना राष्ट्रपती बनवण्याच्या बातम्या चालवत असतील तर त्याला काही आधार नाही.
प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला विरोधी पक्षांनी संमती दिली होती.
अलीकडे प्रशांत किशोर यांनी पवार यांच्या निवासस्थानी दोनदा भेट घेतली होती.
त्या काळात देशातील विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपच्या विरोधात नवीन राजकीय समीकरण किंवा तिसर्या आघाडीची तयारी करत असल्याची चर्चा होती.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ सन २०२२ मध्येच पूर्ण होईल, अशा परिस्थितीत देश नव्या राष्ट्रपतींच्या शोधात असेल.
शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवला जात असल्याबाबत बातम्यांमध्ये काही अर्थ नसल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनीही शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केल्याच्या बातम्या फेटाळले आहेत.