Priyanka Gandhi : त्या आल्या…त्यांनी पाहिलेही नाही अन् निघून गेल्या | पुढारी

Priyanka Gandhi : त्या आल्या...त्यांनी पाहिलेही नाही अन् निघून गेल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खासगी दौर्‍यानिमित्त पुण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी गुरुवारी पुण्यात आल्या. मात्र काँग्रेस पदाधिकार्‍यांची निराशा झाली. कारण, त्या लोहगाव विमानतळाच्या लॉबीतून बाहेर पडल्या… त्यांनी स्वागतासाठी आलेल्या पदाधिकार्‍यांकडे पाहिलेही नाही. त्या थेट कारमध्ये बसून निघून गेल्या. प्रियांका गांधी खासगी कामानिमित्त गुरुवारी पुण्यात आल्या होत्या. याची कल्पना पुणे शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांचे स्वागत आणि भेट घेण्यासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, अजित दरेकर, माजी महापौर कमल व्यवहारे आदी पदाधिकारी लोहगाव विमानतळ येथे पोचले होते. निळ्या रंगाचा सलवार कुर्ता परिधान केलेल्या प्रियांका गांधी या विमानतळाच्या लॉबीतून बाहेर पडल्या. सुरक्षा व्यवस्थेसाठी उपस्थित असलेल्या कर्मचारी, वाहनांचा ताफा डावलून त्या थेट एका व्हॅगनर कारमध्ये बसल्या आणि पुढे मार्गस्थ झाल्या. या वेळी पदाधिकार्‍यांनी त्यांना आवाज देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

“प्रियांका गांधी या आमच्या नेत्या आहेत. त्या पुण्यात खासगी भेटीसाठी आल्या होत्या. त्यांनी कोणालाही भेटणार नसल्याचे कळविले होते. आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून तेथे गेलो होतो. त्यांची खासगी कामानिमित्त भेट असली, तरी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे कोणीही पदाधिकारी गेले नाही असे चित्र दिसले असते. त्यांनी सुरक्षा व्यवस्था न घेता खासगी वाहनातून प्रवास करणे पसंत केले,”असे मत स्वागताला गेलेल्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

तीन वर्षांनंतर सरकार पडले तर सर्वपक्षीय सरकार स्थापावे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे ‘क्रीडा पर्यटना’ला चालना : पंतप्रधान मोदी

उपाध्यक्षांच्या निर्णयांना बांधील नाही : राहुल नार्वेकर

Back to top button