जळगाव : शहीद जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन | पुढारी

जळगाव : शहीद जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जळगाव येथील भडगाव शहरातील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे या हुतात्मा जवानाच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा :

शहिद जवान निलेश रामभाऊ सोनवणे यांच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात गिरणा नदी पात्रात शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले. शहिद जवान निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भडगाव तालुका परीसरातील तरुण तसेच रजेवर घरी आलेले सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, शहरातील नागरीक, महिला वर्ग, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :

निलेश सोनवणे  या जवानाला  लेह-लडाख येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते.  त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी येथे लष्कराचे अधिकारी आणि जवानांनी भडगाव यांच्या मुळगावी आणले होते. त्यांच्या अंत्यविधीला पंचक्रोशीतील जनसागर उसळला होता. यावेळी प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते.

भडगाव येथील टोणगाव भागातील रहीवाशी निलेश रामभाऊ सोनवणे (वय ३०) या जवानाचे कर्तव्यावर असताना लेह-लडाख मध्ये निधन झाले होते. जवान निलेश सोनवणे या जवानाचे निधन झाल्याचे वृत्त भडगाव येथे धडकताच  सोनवणे परीवारसह परीसरात, तालुक्यात शोककळा पसरली.

निलेश सोनवणे यांच्या टोणगाव भागातील घराजवळ परीसरातील नागरिक, मित्र परिवार, युवकांची मोठी गर्दी झाली  होती. जवानाचे पार्थिव सोमवारी भडगावात  पोहचले.

हे ही वाचा :

शहरातील टोणगाव भागातील रहीवासी निलेश सोनवणे हे भारतीय सैन्यात महार रेजिमंट मध्ये कार्यरत होते .

त्यांचे पार्थिव लेह येथून विमानाने दिल्ली येथे आणले. तेथून नाशिक येथे नाशिकहून वाहनाने भडगावला आणले. निलेश सोनवणे २०१० पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते.  त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ असा परिवार आहे. दोन मोठे बंधू बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस सेवेत कर्तव्यावर आहेत. त्यांचे तीन भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतात.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

Back to top button