Pune News : कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार!

Pune News : कात्रज चौकातील उड्डाणपुलाची लांबी वाढणार!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वंडरसिटी ते राजस सोसायटीदरम्यान कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाची लांबी राजस सोसायटी चौकाच्या पुढे 150 मीटर वाढवण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. दरम्यान, बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी 200 कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्याचे पत्र राज्य शासनाने महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित बातम्या :

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते. कात्रज कोंढवा रस्त्याची 84 ऐवजी आता 50 मीटर रुंदी केली जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यापैकी 200 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

त्यानुसार या निधीबाबत राज्य सरकारकडून पालिकेला पत्र आले आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याचबरोबर या रस्त्यावरील भूसंपादनामध्ये येणार्‍या अडचणी कमी करण्यासाठी सध्या वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंतचा उड्डाणपूल 150 मीटरपर्यंत वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. 150 मीटरपर्यंत उड्डाणपूल वाढविल्यास अनेक घरांच्या जागांचे संपादन करावे लागणार नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news