गडचिरोलीत जोरदार पाऊस; पुरामुळे दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद | पुढारी

गडचिरोलीत जोरदार पाऊस; पुरामुळे दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद

गडचिरोली ; पुढारी वत्‍तसेवा : जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे. छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button