Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज | पुढारी

Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील सुमारे 350 मंडळांना पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आली असून, काही मंडाळांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बाप्पाच्या स्वागतासह विसर्जन मिरवणूक आणि गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. 

संबधित बातम्या :

गणेशोत्सवात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी होण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने नियोजन केले आहे. रस्त्यालगत असलेल्या मंडपाजवळ स्वयंसेवक नियुक्तीसह वाहतुकीची स्वयंशिस्त ठेववी आणि साउंड सिस्टीमवरही डेसिबलचे बंधन पाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भक्तांच्या वाहनांचे पार्किंग करण्यासाठी स्वतंत्र जागा यासारख्या मुद्द्यांवर आधारित मंडळाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीने हमीपत्र घेऊन परवानगी देण्यात येत आहे.

दरम्यान, सर्व ना-हरकत दाखल्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या पडताळणीअंती प्राप्त अर्जांपैकी ६० टक्क्यांहून अधिक अर्ज निकाली काढले आहेत. त्यानुसार सुमारे ३५० मंडळांना परवानगी दिली आहे. बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणुकीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे यांनी सांगितले.

गणेशोत्सवाची तयारी

जिल्ह्यातील मंडळे : ९००

मानाची मंडळे : २०

भव्य मूर्ती असलेली मंडळे : १०

हेही वाचा :

Back to top button