मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाड; प्रवाशांना फटका | पुढारी

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाड; प्रवाशांना फटका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कल्याण रेल्वे स्थानकात आज (मंगळवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी वाहतूक रखडली. याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला.

कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरील सिग्नल यंत्रनेत सकाळी साडेसहा वाजता बिघाड झाला. यामुळे कल्याण स्थानकातून होणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ वाजता बिघाड दुरुस्त करून सिग्नल यंत्रणा सुरु केली. परंतु यामुळे लोकलचा खोलंबा झाला.

लोकलची वाहतूक रखडल्याने सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. लोकल १५ ते २० मिनिट उशीराने धावत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button