पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची स्वागताला उपस्थिती | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची स्वागताला उपस्थिती

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन : टिळक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. लोहगाव विमानतळावर मोदींच्या विमानाने लँड केले. हेलिकॉप्टरने ते पुण्यातील सिंचन नगर मैदानावर उतरणार आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर असतील. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्याचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करणार आहेत. या व्यतिरीक्त ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करणार आहेत.

ब्रेकिंग : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड

अहमदनगर : प्लॉटच्या वादातून माजी सैनिकाचा खून

ऑगस्ट महिना घेऊन आलाय पाच आर्थिक बदल

Back to top button