ऑगस्ट महिना घेऊन आलाय पाच आर्थिक बदल | पुढारी

ऑगस्ट महिना घेऊन आलाय पाच आर्थिक बदल

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिना काही नवीन बदल घेऊन येत असून ज्याचा नागरिकांच्या बचत आणि गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. या बदलांमध्ये आयटीआर दंड लागू होईल, गुंतवणूक योजनांची अंतिम मुदत संपेल आदींसह पाच बदल होणार आहेत. त्यामध्ये नागरिकांच्या खिशावरही ताण पडू शकतो, तर स्टेट बँकेच्या ठेवींवर अधिक व्याज मिळवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

विलंबित आयटीआरसाठी दंड भरावा लागणार

ज्या करदात्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत त्यांचे आयकर विवरणपत्र भरले नाही. त्यांना दंड भरावा लागणार आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम २३४ एफ अंतर्गत ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. मात्र, लहान करदात्यांना १ हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

एसबीआयच्या अमृत कलश योजनेची अंतिम मुदत

एसबीआयच्या एफडी स्कीम अमृत कलशमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत वेळ आहे. ४०० दिवसांच्या या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नियमित ग्राहकांना ७.१ टक्के व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के व्याज दिले जाते.

गॅस सिलिंडर दरात कपात

दर महिन्याच्या एका तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होत असतात. एलपीजी सिलिंडरसोबतच १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही १ ऑगस्टला बदलली आहे.

आयडीबीआय बँक अमृत महोत्सव एफडी

आयडीबीआय बँक ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांची अमृत महोत्सव एफडी चालवत आहे. बँक ३७५ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडीवर ७.६०% व्याजदर देत आहे, तर ४४४ दिवसांसाठी ७.६० टक्के व्याजदर दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूकदार १५ ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

इंडियन बैंक आयएनडी सुपर ४०० दिवस

इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्यासाठी ६ मार्च २०२३ पासून आयएनडी सुपर ४०० दिवस एफडी योजना सुरू केली आहे. ४०० दिवसांच्या कालावधीसह या योजनेवर दहा हजार ते २ कोटी रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.

हेही वाचा : 

Back to top button