ब्रेकिंग : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड | पुढारी

ब्रेकिंग : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये फूट पडल्‍यानंतर विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्तावित करावे, असे काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना कळवले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांचा एक गट घेऊन पक्षाच्या बाहेर पडत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधानसभेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. काँग्रेसकडून या पदासाठी विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या नावांची चर्चा होती. अखेर विजय वडेट्टीवार यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्याने विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचे नाव एलओपी म्हणून ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button