पिंपरी : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्‍यावर गुन्हा

पिंपरी : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्‍यावर गुन्हा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाणी भरण्यासाठी इथे का आली, असे म्हणत एकाने पत्नीसह तिच्या बहिणीला मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 28) पिंपरी येथे घडला. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेचा पती आणि त्याच्या अन्य चार नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण घरासमोर पाणी भरत असताना फिर्यादी यांचा पती तिथे आला. 'तू इथे काय करीत आहेस, तुला इथे कोणी बोलावलं आहे", असे म्हणत त्याने फिर्यादीच्या बहिणीला शिवीगाळ केली. तसेच, आरोपीचे कुटुंबीयांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांची बहीण व फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, घरातून हाकलून देत घराला कुलूप लावले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news