

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेता आर. माधवनने अगणित दमदार परफॉर्मन्स दिले ज्याने प्रेक्षकांची मने तर जिंकली. पण आर माधवन हा अष्टपैलू अभिनेता देखील ठरला. (R Madhavan) त्याचा कलाकृती या नेहमीच वेगळ्या आणि प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या असतात. या वर्षी आर माधवन नवनवीन प्रोजेक्ट करणार असून तो सध्या लंडनमध्ये त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याचं समजतंय. (R Madhavan)
आर माधवनने एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या विनोदी कॅप्शन दिलं "लंडनमध्ये काम करण्यासाठी थोडीशी रंगत आणतोय ?????❤️"
आर माधवनने नुकतंच "टेस्ट"च्या शूटिंगचे अंतिम शेड्यूल पूर्ण केले. यंदा त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी आयफा पुरस्कार देखील जिंकला. आता आर माधवन नक्की अजून कोणत्या चित्रपटात दिसणार हे बघण उत्सुकतेचं असणार आहे.