Pune Theft : प्रवासात चोरट्यांनी व्यापाराचे २ किलो सोने, १८ लाख लांबवले | पुढारी

Pune Theft : प्रवासात चोरट्यांनी व्यापाराचे २ किलो सोने, १८ लाख लांबवले

सारोळा (पुणे); पुढारी वृत्तसेवा :

मुंबई येथील व्यापाऱ्याचे तब्बल १ कोटीचे सोने व रोकड रक्कम तीन चोरट्यांनी लांबविले आहेत. (Pune Theft) ही घटना व्यापारी मुंबई-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाका कोल्हापूर ते खेडशिवापूर टोलनाका (ता. हवेली) दरम्यान प्रवासात असताना घडली. (Pune Theft) सोमवारी मध्यरात्री प्रवासात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी (दि.११) रात्री या व्यापाऱ्याने फिर्याद दिली.

राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळी (कर्नाटक) हून मुंबईला बसने व्यापारी कमलेश सुकनराज राठोड (वय ४८, रा. भांडुप पश्चिम मुंबई) जात होते. प्रवासादरम्यान, त्यांच्याकडील ऐवज सोमवारी (दि.११) मध्यरात्री १२ ते ३ च्या दरम्यान चोरी झाला. किणी टोल नाका कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका (ता. हवेली) दरम्यान शेजारी बसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी हा ऐवज चोरला.

त्यात ८१,२४,००० किंमतीचे २११० ग्रॅम वजनाचे १८ कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागिने होते. १८ लाखांची रोख रक्कम चोरल्याची तक्रार राजगड पोलीसात देण्यात आली आहे.

पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.

Back to top button