नाशिक : अवैध देशी मद्य कारखान्यावर छापा, १ कोटीचा मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : अवैध देशी मद्य कारखान्यावर छापा, १ कोटीचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. यात पोलिसांनी 1 कोटींचा मद्यसाठा जप्त करीत 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्याप्रमाणे ग्रामीण पोलीस पथकाने सोमवारी रात्री अकरा वाजता लॉन्सवर छापा टाकला.

या ठिकाणी संशयित संजय मल्हारी दाते (४७, रा. गोंडेगाव, ता. निफाड जि. नाशिक) मिळून आला. त्याच्याकडे बनावट देशी दारूचे सुमारे १५०० ते २००० बॉक्स, सुमारे १०,००० ते १५,००० देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्पिरीट अंदाजे २० हजार लिटर, २०० लिटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे ५,००० ते १०,०००, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या टाक्या ५ आणि १ ट्रक असा एकूण अंदाजे १ कोटी रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. तो ताब्यात घेण्यात आला आहे. हा देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्स मध्ये सुरू होता.

हे ही वाचा

पहा व्हिडिओ : चला पाहूया नवरात्री स्पेशल साबूदाणा थालीपीठ Recipe | Navatri 2021 special

Back to top button