पुणे : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची लसीकरण केंद्राला मध्यरात्री भेट | पुढारी

पुणे : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची लसीकरण केंद्राला मध्यरात्री भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा :

सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. पहिली व दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आपल्या टीमसह वाघोली केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मध्यरात्री लसीकरण केंद्रावर भेट दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही. याची दक्षता घ्यावी. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

सलग ७५ तास कोविड लसीकरण सुरू आहे. आणि सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही सुरु आहे.  या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बारामती तालुक्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. महिला रुग्णालय, मुळशी तालुक्यातील उपकेंद्र हिंजवडी या केंद्रावर सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ दुपारी ११ वाजेपर्यंत सलग ७५ तास कोविड लसीकरण राबविण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात एकंदरीत ८९८ खासगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खासगी संस्थांचा सहभाग लक्षात घेतला. एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांचा होणार सन्मान

मिशन कवच कुंडल योजनेमध्ये कोविड लसीकरणाचे सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांना सन्मान मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नगरपालिका, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालये, तालुके, ग्रामपंचायत यांमध्ये प्रथम तीन येणाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

विशेष कोविड लसीकरण मोहिमेमध्ये पूर्ण संरक्षित झालेल्या गावांमधील सरंपच व ग्रामसेवक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांनी याबाबत विशेष नियोजन करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button