युवराज सिंग याला होणार अटक; लाइव्ह चॅटवरून अडचणीत | पुढारी

युवराज सिंग याला होणार अटक; लाइव्ह चॅटवरून अडचणीत

चंदीगढ, पुढारी ऑनलाईन

मित्रांसोबत लाइव्ह चॅट करताना वापरलेल्या एका शब्दाला आक्षेप घेत क्रिकेटपटू युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला तात्पुरती अटक करण्यात येणार आहे. युवराजला अटक झाल्यानंतर शपथपत्र आणि जामीन अर्ज सादर करताच त्याला सोडून देण्यात येईल, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

१ एप्रिल, २०२० रोजी युवराज सिंग क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत सोशल मीडियावर लाइव्ह चॅट करत होता. त्यावेळी विनोदाने काही चॅट केले होते. लॉकडाऊनबाबत झालेल्या चर्चेत त्याने त्याने युझवेंद्र सिंह आणि कुलदीप यादव यांना विनोदाने काहीतरी म्हटले. यानंतर या चॅटचा व्हिडिओ व्हायरल झाला. युवराज सिंगचे शब्द अनुसूचित जातीच्या अपमानाशी जोडले गेले. युवराज सिंगविरोधात हांसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी युवराज सिंगने हायकोर्टात याचिका दाखल करून अटक न करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे, ‘हे शब्द माझ्या एका मित्राच्या वडिलांवर एकाच्या लग्नात नाचताना टिप्पणी म्हणून म्हटले होते.’ युवराजचे हे शब्द अनुसूचित जातीच्या लोकांसाठी अपमानास्पद शब्द म्हणून वापरला जातो असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता.

याआधी, ज्येष्ठ विधीज्ञ पुनीत बाली, युवराज सिंगचे वकील यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद केला होता. याचिकाकर्ता आणि त्याचा मित्र यांच्यातील संभाषणाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये या शब्दाचा वापर कोणाचा हेतू कोणत्याही प्रकारे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या सदस्यांविरूद्ध शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्दम्य भावनांना उत्तेजन देण्याचा नव्हता. त्यांनी फक्त मद्यधुंद व्यक्तीबाबत विनोदाने टिप्पन्नी केली होती.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने युवराज सिंगला तात्पुरती अटक करून जामीन देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button