भूकंपाच्या धक्क्यांनी हादरतोय लाल ग्रह, नासाचे संशोधन | पुढारी

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरतोय लाल ग्रह, नासाचे संशोधन

वॉशिंग्टन : लाल ग्रह पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रहावरही सातत्याने भूकंप होतच असतात. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या इनसाईट लँडरने नुकताच मंगळावरील या भूकंपाच्या धक्क्यांचा शोध लावला आहे. सध्या मंगळावर कार्यरत असलेल्या इनसाईट लँडरने भूगर्भीय आवाज रेकॉर्ड केला आहे.

मंगळावरील या आवाजाचा अभ्यास करून ‘नासा’ने मंगळावर शक्तिशाली आणि दीर्घकाळापर्यंत चालणार्‍या भूकंपाचा शोध लावला. या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदविली गेली. तर हा धक्का तब्बल दीड तास जाणवत होता.

18 सप्टेंबर रोजी नोंदविलेला हा भूकंप महिन्याभरातील तिसरा भूकंप ठरला. इनसाईट लँडरने गेल्या 25 ऑगस्ट रोजी सिस्मोमीटरवर 4.2 आणि 4.1 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा शोध लावला आहे. मात्र, 18 सप्टेंबर रोजी आलेला भूकंप हा उर्वरित दोन धक्क्यांपेक्षा पाचपटीने अधिक तीव्रतेचा होता.

लाल ग्रह

दरम्यान, 2019 मध्येही 3.7 इतका तीव्रतेचा धक्का नोंदविण्यात आला होता. हा धक्के सध्या इनसाईट लँडर कार्यरत असलेल्या ठिकाणापासून 8500 कि.मी. अंतरावर आला होता. लँडरने नोंद केलेला हा सर्वात जास्त अंतरावरचा भूकंप होता. शास्त्रज्ञ सध्या या भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

इनसाईट लँडरने आजपर्यंत मंगळावर आलेल्या भूकंपाच्या अनेक धक्क्यांचा शोध लावला आहे. जे 1609 किलोमीटर अंतरावरील क्षेत्रात होते. उल्लेखनीय बाब म्हणजे इनसाईट लँडरमधील सिस्मोमीटर हे रात्रीच्या सुमारास भूकंपाची नोंद करतो. रात्रीच्या सुमारास मंगळावरील वातावरण अत्यंत थंड असते आणि वार्‍याचा वेगही कमी असतो. हे लँडर गेल्या दोन वर्षांपासून मंगळावर कार्यरत आहे. हे बहुपयोगी इनसाईट लँडर 2018 मध्ये मंगळावर यशस्वीपणे उतरले होते.

Back to top button