नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या; व्हिडिओमुळे तर्कवितर्क

नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या; व्हिडिओमुळे तर्कवितर्क
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरणी अनेक धक्‍कादायक माहिती समाेर येत आहेत. त्‍यांनी आत्‍महत्या केली की त्‍यांची हत्या झाली असे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत  आहे.  ज्या पंख्याला लटकून गिरी यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय तो पंखा सुरू आहे. तसेच नरेंद्र गिरी यांचा मृतदेह फरशीवर पडलेला असल्‍याचे या व्हायरल व्हिडिओमध्‍ये दिसत आहे.

हा व्हिडिओमध्‍ये खोलीतील पंखा सुरू असल्याचेही दिसते.

आयजी के. पी. सिंग मठातील शिष्यांची चौकशी करत असल्याचे यात दिसते.

१. ४५ मिनिटांचा हा व्हिडिओ महंतांच्या खोलीतील आहे. याच खोलीत नरेंद्र गिरी यांनी पंख्याला नॉयलॉनची दोरी लावून गळफास घेतला होता.

व्हिडिओच्या सुरुवातीला गिरी यांचा मृतदेह फरशीवर पडलेले दिसताे.

त्यांच्या बाजुला सुसाइड नोटमध्ये उत्तराधिकारी घोषित केलेले बलबीर गिरी उभे आहेत.

दुसऱ्या फ्रेममध्ये फोटोग्राफर आणि पोलिस अधिकारी दिसतात.

त्यानंतर तेथे असलेले अंथरुण आणि कपाटातील सर्टिफिकेट आणि फोटो दिसतात.

त्यानंतर पुढच्या फ्रेममध्ये फिरणारा पंखा दिसतो. या पंख्याला पिवळ्या रंगाची नॉयलॉनची तुटलेली दोरी दिसते.

फरशीवर पडलेल्या मृतदेहाच्या गळ्यात याच नॉयलॉनच्या दोरीचा तुकडा अडकलेला दिसतो.

त्यानंतर काही वेळाने आयज के. पी. सिंह दरवाजात उभ्या असलेल्या महंतांच्या शिष्यांची चौकशी करताना दिसत  आहेत.

'हा पंखा सुरू होता की, आता सुरू केलाय' असे ते विचारत आहेत. यावर सुमित नावाच्या एका शिष्याने हा पंखा त्याने सुरू केल्याचे सांगितले.

आयजी पुन्हा त्याबाबत काही प्रश्न विचारतात; पण त्याचे उत्तर न देता दुसऱ्याच बाबी तो सांगत असल्याचे व्हिडिओत दिसते.

दोरीचे तीन तुकडे

ज्या दोरीने महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या गळफास घेतला त्या दोरीचे तीन तुकडे झाल्याचे दिसत आहेत. जर दोरी कापून मृतदेह खाली उतरला असला तरी तिसरा तुकडा कुठून आला हे सारे संशयास्पद आहे. या दोरीचा पहिला तुकडा पंख्याच्या हुकात अडकलेला दिसतो, दुसरा मृतदेहाच्या गळ्यात तर तिसरा तुकडा काचेच्या टेबलावर असल्‍याचेही या व्हिडिओमुळे उघडकीस आले आहे.

हेही वाचलं का?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news