शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना झटका | पुढारी

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना झटका

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना झटका दिला आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या भाजप प्रवेशामुळे शहरात नवीन राजकीय समीकरणे सुरु झाली आहेत.

मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

श्रीरंग बारणे हे मावळमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. तर लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button