File Photo
File Photo

पुणे : तरुणाचा गळा दाबून खून

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणी काळभोरमधील छत्रपती शिवाजी उद्यान येथील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विजय ऊर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय २३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ रोहित मोरे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचा गळा दाबून खून झाल्‍याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मोरे हा खोदकामाचे मिळेल तेथे मजुरी काम करत होता. त्याला दोन वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन होते. विजय हा आईसह रहात होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ व पत्नी, मुलगी राहतात. विजय रविवारी रात्री साडेदहा वाजता अर्ध्या तासात जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर गेला होता. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे त्याची आई कांताबाई मोरे यांनी सकाळी रोहित याला सांगितले.

रोहित त्याला शोधायला बाहेर गेला. तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या विनोद जाधव याने पाण्याच्या टाकीजवळ विजय बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्‍याचा मृत्‍यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news