पुणे; पुढारी वृत्तसेवा : चालूवर्ष 2021-22 मधील ऊस गाळप धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची महत्वपूर्ण बैठक आज (दि.13) मुंबईत होत आहे. चालूवर्षी 1 हजार 96 लाख मे.टनाइतके उसाचे उच्चांकी गाळप अपेक्षित आहे. ऊस गाळप हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोंबर की 1 नोव्हेंबरपासून करायची याची तारीख निश्चितीसह अन्य महत्वपूर्ण निर्णय बैठकीत अपेक्षित आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडे बारा वाजता होणार्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व अन्य मंत्री, साखर संघ प्रतिनिधी, साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील चालूवर्षाच्या उसाच्या जादा उपलब्धतेमुळे गाळप हंगामास 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात करण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.
सुरुवातीस उतारा कमी मिळत असल्याने 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरु करावा असाही मतप्रवाह आहे.
त्यामुळे हंगामाच्या तारीख निश्चिती आणि एकूणच ऊस गाळप हंगामाच्या नियोजनावर प्राधान्याने चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वसंतदादा साखर संस्था, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, साखर संकुल देखभाल निधी, कामगारांची देणे भागविण्यासाठीच्या कपातीवर चर्चा होऊन निर्णय होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
ऊस गाळप हंगाम २०२१-२२ ची पूर्वतयारी
* ऊस लागवड क्षेत्र – 12.32 लाख हेक्टर
* ऊस उत्पादकता – 97 टन प्रति हेक्टरी
* ऊस गाळप – 1096 लाख टन
* साखर उत्पादन – 112 लाख टन
* इथेनॉलसाठी साखर घट – 10 लाख टन
* सरासरी साखर उतारा – 11.16 टक्के
* हंगाम घेणारे कारखाने – अंदाजे 193 साखर कारखाने
हेही वाचलं का ?
[visual_portfolio id="36908"]