Pune Crime : पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Pune Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पुणे येथील दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनेला वाचा फुटली. (Pune Crime)
घरातून एका तरुणीच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे गल्लीतील लोकांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना फोन केला. ही घटना जनता वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. पीडित तरूणीला मानसिक आजार असल्याचे समजते.
- टोमॅटो पिकाचे दर का घसरले? खर्च निघेना, रस्त्यावर फेकण्याची वेळ
- अजित पवार यांनी घेतला रिक्षा चालवण्याचा आनंद
श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय १९), सुर्वेश जाधव (वय ३६) आणि आशिष मोहिते (वय १८, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, पीडित २५ वर्षाची तरुणी भारती विद्यापीठ परिसरात राहते. ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरुन घरी जात होती.
- नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल
- भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये घडवला इतिहास
यावेळी आरोपींपैकी एकाने तिची ओळख काढून जनता वसाहतीत आणले. त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.
- ‘इसिस’ ISIS ला अमेरिकेचे सडेतोड उत्तर, ड्रोन हल्ल्यात दहशतवादी ठार
- लवंग पीक आपल्याकडेही घेता येते; जाणून घ्या लागवड कशी करावी?
हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.
हे ही वाचा :
- अंकुश राणे प्रकरण : ‘आगीत तेल ओतण्याचे काम विनायक राऊत यांनी करू नये’
- अफगाणिस्तान : काबूलचे सामूहिक हत्याकांड
- वडील लेकीला फोनवर म्हणाले, दहा मिनिटात येतो पण त्या क्षणानंतर…