चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाची चिनी लँडरकडून पुष्टी | पुढारी

चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाची चिनी लँडरकडून पुष्टी

बीजिंग : चीनने चांद्रभूमीवर ‘चांग ई-5’ हे लँडर उतरवले आहे. चंद्रावर नैसर्गिकरीत्या पाणी असल्याच्या पुराव्यांची या लँडरने पुष्टी केली आहे. चिनी यानाने चंद्रावरील पृष्ठभागावरून माती व खडकांचे काही नमुने गोळा केले आहेत. त्यामधून ही पुष्टी झाली आहे.

2020 मध्ये ‘चांग ई-5’ने 11 बेसॉल्ट खडक आणि मातीच्या नमुन्यांमध्ये पाण्याच्या संकेतांची पुष्टी केलेली होती. 2021 मध्ये पुन्हा एकदा लँडरच्या त्याचवर्षी पाठवलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले व ही पुष्टी अधोरेखित झाली. आता ‘चांग ई-5’च्या टीमने हे पाणी कुठून आलेले असू शकते यावरही संशोधन केले आहे. या संशोधनाची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चिनी विज्ञान अकादमीच्या राष्ट्रीय खगोलीय वेधशाळेतील एल.आय. चुनलाई यांनी सांगितले की जगात प्रथमच चंद्रावरून आणलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणांचे परिणाम आणि इन-सीटू चांद्र पृष्ठभाग सर्वेक्षणाच्या डेटाला संयुक्त रूपाने चंद्राच्या नमुन्यांमध्ये पाण्याची उपस्थिती, स्वरूप व प्रमाणाची तपासणी करण्यात आली. लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर खडक आणि माती सरासरी 30 हायड्रॉक्सिल भाग प्रति दशलक्षात शोधले.

संबंधित बातम्या
Back to top button