रेशन दुकानांना ’आयएसओ’; खडकवासला विभागातील सर्वच दुकानांना एकाचवेळी मानांकन | पुढारी

रेशन दुकानांना ’आयएसओ’; खडकवासला विभागातील सर्वच दुकानांना एकाचवेळी मानांकन

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड, पश्चिम हवेलीसह खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व रेशनिंग दुकानांना दर्जेदार ग्राहक सेवेसाठी आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन मिळाली आहेत. एकाच वेळी सर्व दुकानांना मानाकंन मिळवून खडकवासला विभागाने राज्यात बाजी मारली आहे.

वर्षांनुवर्षे ग्राहकांच्या तक्रारी, गैरव्यवहाराचे प्रकार घडणार्‍या रेशनिंग दुकानातील अन्नधान्य वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या सुलभ वितरण मोहिमेला रेशनिंग दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे ( अन्न पुरवठा ) विभागाचे उपायुक्त कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा वितरण परिमंडळ विभागाने मोहीम राबवली.

उंबर्‍या गणपती चौकात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीने धायरीकर हैराण

एकाच वेळी खडकवासला विभागातील 52 रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. खानापूर येथील नंदकुमार जावळकर, डोणजे येथील संतोष भगत याच्यासह रेशन दुकानदारांचा पुरवठा विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी खडकवासलाचे परिमंडळ अधिकारी गणेश देशमुख, पुरवठा निरीक्षक राजश्री भंडारी, प्रदीप डंगारे, चांगदेव नागरगोजे, पल्लवी सपकाळे, रेशन दुकानदार संघटनेचे गणेश डांगी आदी उपस्थित होते.

राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. शासनाच्या विविध योजनांचे अन्नधान्य गरजू लाभार्थी, रेशनकार्डधारकांना वेळेवर मिळावे, वितरण व्यवस्था सुलभ व पारदर्शक व्हावी यासाठी याचा उपयोग होणार आहे. रेशन दुकानांत ग्राहकांना शासकीय अन्नधान्यासह इतर सेवा उपलब्ध करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.

                  – गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, खडकवासला

हेही वाचा

अतिक्रमण, दुरावस्थेमुळे वाघोलीत पदपथ नावालाच

वाघोली रस्त्यावर होतोय वाहनचालकांना मनस्ताप; जलवाहिनीसाठी होणार्‍या खोदाईचा परिणाम

वाहतूक पोलिस टोळधाडीला लगाम; आता फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश

Back to top button