उंबर्‍या गणपती चौकात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीने धायरीकर हैराण | पुढारी

उंबर्‍या गणपती चौकात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीने धायरीकर हैराण

धायरी, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील उंबर्‍या गणपती चौकात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या चौकात धायरी गावातून येणारा रस्ता, डीएसके बाजूकडून, नर्‍हे बाजूकडून व धायरी फाटा बाजूकडून येणारे रस्ते एकत्र येतात. दरम्यान, या चौकात नर्‍हे रस्त्यावर मद्यविक्रीचे दुकान आहे.

येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. मद्य घेण्यासाठी या दुकानात गेल्यावर दुकानातही रांग असते. त्यामुळे बराच वेळ त्यांनी रस्त्यावर आडवीतिडवी उभी केलेली वाहने उभी असतात. या वाहनांमुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे संपूर्ण चौक चक्का जाम होऊन बराच वेळ वाहनांना व नागरिकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने सर्वच जण हैराण झाले आहेत.

यामुळे येथून जाणारे-येणारे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. याकरिता या सर्वांची या कोंडीतून त्वरित सुटका करावी, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख राज कदम यांनी केली आहे.

हेही वाचा

पावसाचे पाणी शिरले देवळात, घराघरात; नालेसफाई न झाल्याचा परिणाम

बांधकामावर पालिकेचा हातोडा; भारती विद्यापीठ परिसरात कारवाई

बीड : धारूर नगरपरिषदेच्या दहा प्रभागातील वीस जागांचे आरक्षण जाहीर ; निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजणार

 

Back to top button