पुणे : एका दिवसात 90 हजार सातबारा डाऊनलोडचा राज्यातील उच्चांक | पुढारी

पुणे : एका दिवसात 90 हजार सातबारा डाऊनलोडचा राज्यातील उच्चांक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नागरिकांनी शासनाच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करून 23 मे रोजी एका दिवसात 90 हजार नागरिकांनी एक लाख नऊ हजार उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड केल्या. राज्यातील हा उच्चांक आहे. महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतार्‍यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक 8-अ) मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्यावर नागरिकांचा भर आहे.

हिंगोली : भरधाव कारच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती जखमी

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि ’8-अ’ उतारे नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकतपत्रिकादेखील आता मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी-विक्रीसाठी सातबारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत.

त्यानुसार एका दिवसात डिजिटल स्वाक्षरीतील एक लाख नऊ हजार सातबारा आणि खाते उतारे, तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 78 हजार 909 साताबारा उतारे आहेत. 8-अ उतारे 20 हजार 372 आणि मिळकतपत्रिका 6 हजार 279 आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध उतारे डाऊनलोड केल्याने शासनाला 23 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.

सांस्कृतिक केंद्रालगतचे गाळे भुईसपाट: बारामतीत पालिकेकडून कारवाई

मोठ्या संख्येने डाऊनलोड झालेले उतारे

19 एप्रिल 2022                एक लाख दोन हजार
14 फेब्रुवारी 2022                एक लाख
16 जून 2021                      62 हजार
7 एप्रिल 2021                     38 हजार
16 मार्च 2021                   40 हजार 200
22 फेब्रुवारी 2021                 46 हजार

हेही वाचा

कोल्‍हापूर : भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्‍यू

महिलांची पाण्यासाठी वणवण थांबणार; पाणी पुरवठा योजनेचे आमदार काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

याेगी सरकारचा माेठा निर्णय : युपीत महिला कामगारांची नाईट शिफ्ट रद्द

Back to top button