जळोची : सोशल मीडियामुळे हरवतोय नात्यांमधील संवाद

जळोची : सोशल मीडियामुळे हरवतोय नात्यांमधील संवाद
Published on
Updated on

अनिल सावळे पाटील

जळोची : माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग जवळ आले असले, तरी नातेसंबंधांत मात्र दरी पडली आहे. आई-वडील व मुले, मित्र-नातेवाईक यांच्यामध्ये होत असणारा सहज, नैसर्गिक संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे पालकांनी सावध राहावे, असा इशारा मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे. सोशल मीडिया हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर, पिंटरेस्ट, कोरा इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जवळपास दिवसभर असणारा वावर नातेसंबंधांच्या मुळावर आला आहे. तसेच त्याचा गैरवापर नात्यात दुरावा निर्माण करू लागला आहे. सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर केला, तर त्याचा नक्की फायदा होतो. पण, आता सोशल मीडियाचे लोकांना व्यसन लागले आहे.

सोशल मीडियामध्ये चर्चिल्या जाणार्‍या प्रत्येक विषयावर मत देण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. ही सवय 'अ‍ॅडिक्शन' कधी बनते, हे कळतच नाही. सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कुठल्या ना कुठल्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मोह काही व्यक्तींना आवरता येत नाही आणि आपली ही हौस अशा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भागवून घेत असतात. असे करताना ते सोशल मीडियाच्या आहारी कधी जातात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.

समुपदेशन गरजेचे मोबाईलवर एकसारखे कार्यरत राहिल्याने मेंदू व डोळा यावर परिणाम होतो. तसेच हृदयावरही परिणाम होऊन हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो. मानसिक आजार उद्भवू शकतात. मैदानी व इतर खेळ सोशल मीडियाच्या आहारी गेलेले विद्यार्थी खेळत नसल्याने त्यांना अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. पालकांनी वेळीच लक्ष घालून पाल्याचे समुपदेशन केले पाहिजे, असे मत मनोविकार व संमोहनतज्ज्ञ विजयकुमार काळे यांनी सांगितले.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बर्‍याचदा लोकांना कोणती तरी भीती किंवा आमिष दाखवूनसुद्धा फसवणूक केली जाऊ शकते. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. सोशल मीडियाचा योग्य तेवढा वापर करा; जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. मोबाईलमधील माहिती कोणाशीही कधीच शेअर करू नका. सध्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पालकांनीसुद्धा पाल्याच्या मोबाईलवर लक्ष ठेवावे.

                                       – महेश ढवाण, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news