वेल्हे : युवकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या: राजगड खोर्‍यातील लव्ही बुद्रुक येथील घटना | पुढारी

वेल्हे : युवकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या: राजगड खोर्‍यातील लव्ही बुद्रुक येथील घटना

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

राजगड खोर्‍यातील लव्ही बुद्रुक (ता. वेल्हे) येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सानिका संतोष रेणुसे (वय 19) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी अविनाश मारुती रेणुसे (वय 19) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

याबाबत मयत सानिका हिचे वडील संजय ऊर्फ संतोष लक्ष्मण रेणुसे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित अविनाश रेणुसे याच्या विरुद्ध सोमवारी (दि. 23) भादंवि 306 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दि. 15 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान लव्ही बुद्रुक येथे घडला.

हर्षवर्धन सदगीर आणि महिलांमध्ये रेश्मा मानेने पटकावली मानाची गदा

संशयित अविनाश याने सानिका हिला मोबाईल फोनवरून अपशब्द बोलत असे. दोघांत जोरजोरात वाद झाला. सानिकाने अविनाशला मला त्रास देऊ नको, असे म्हणत घराचे पाठीमागील बाजूच्या पडवीत गेली. तेथे छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

Back to top button