पिंपरीत 60 टक्के नाले सफाई; उर्वरित कामांसाठी बैठकांचा सपाटा | पुढारी

पिंपरीत 60 टक्के नाले सफाई; उर्वरित कामांसाठी बैठकांचा सपाटा

पिंपरी : पावसाळा तोंडावर आला असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील नाले साफसफाईचे काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा शहरातील नाले तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने नाले सफाईसाठी वेळापत्रक तयार केले होते. शहरातील एकूण 177 नाले 15 मे रोजीपर्यंत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट होते. आजअखेर केवळ 60 टक्के साफसफाई झाली आहे. तसेच, अनेक ठिकाणी नाल्यातून काढलेला राडारोडा, गाळ तसेच बाजूला साचला आहे. उर्वरित नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.

सातारा : मृतदेहांची चिरफाड करताना हात थरथरायचे, पाय लटपटायचे !

शहरामधून पवना व इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते. तर पावसाचे प्रमाण वाढल्यास शहरातील सखल भागात पाणी साचते. नालेसफाई न झाल्यास या भागातील पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. परिणामी, रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडीत भर पडते. नागरिकांच्या घरात पाणी शिरून पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात नागरिकांना या स्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरातील सर्व नाल्यांची सफाई केली जाते. शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहे.

सोलापूर : ड्रेनेज योजना; दंडाबाबत मक्‍तेदाराचा काम बंदचा इशारा

तर काही नाल्यांवर भराव टाकून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी हे नाले अनैसर्गिक पद्धतीने वळवण्यात आले आहे. त्यामुळे या नाल्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. नाल्यामध्ये साचलेला गाळ, कचरा, झाडी झुंडपी, राडारोडा, झालेले अतिक्रमण यामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. हे माहित असताना पालिका प्रशासनाने हे काम जलदगतीने व पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक होते. साधारणत: जूनच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होतो. येत्या दोन ते तीन दिवसांत शहारात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा फटका शहरवासियांना बसण्याची शक्यता आहे.

झेंडूची लागवड करताय, जाणून घ्या फायदेशीर जाती

पावसाळी गटारे सफाईचे कामही संथ गतीने

शहरातील पावसाळी गटारे साफ करण्याचे कामही सुरू आहे. ते काम स्थापत्य व बीआरटीएस विभागाकडून सुरू आहे; मात्र ते कामही संथ गतीने सुरू आहे.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यावर भर

शहरातील नालेसफाईसंदर्भात महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.27) बैठक झाली. सद्यस्थितीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय नालेसफाईचे काम सुरू आहे. नालेसफाईचे एकूण 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली जातील, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा

सातारा : मृतदेहांची चिरफाड करताना हात थरथरायचे, पाय लटपटायचे !

सोलापूर : ड्रेनेज योजना; दंडाबाबत मक्‍तेदाराचा काम बंदचा इशारा

सांगली : विधवा विवाहास हवा अनुदानाचा ‘आहेर’

Back to top button