या सात टंचाईग्रस्त भागांना ‘डिंभे ’तून पाणी | पुढारी

या सात टंचाईग्रस्त भागांना ‘डिंभे ’तून पाणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा 
डिंभे धरणाच्या कालव्याच्या मजबुतीकरणाबरोबरच आता  या धरणाच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध भागांना उपसा सिंचन योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या योजनांमध्ये कळमजाई, फुलवडे , बोरघर, म्हाळसाकांत याबरोबरच कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गावांना शेतीसाठी कळमजाई उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे 0.23 अब्ज घनफूट पाणी 13 गावांतील 1 हजार 499 हेक्टर क्षेत्रास मिळणार आहे. या योजनेसाठी 111 कोटी 34 लाख  रुपये खर्च येणार आहे.

लालपरी’त रोज दीड लाख प्रवासी; उन्हाळी सुट्यांचा परिणाम

या योजनेचे काम सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. फुलवडे व बोरघर उपसा सिंचना योजनेच्या माध्यमातून 134 दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. त्यानुसार बोरघर व फुलवडे या क्षेत्रातील एकूण 583 हेक्टर क्षेत्रास पाणी मिळणार आहे. टंचाईग्रस्त लोणी-धामणी परिसरासाठी असलेल्या म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेद्वारे लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, खडकवाडी, वडगाव पीर, मांदळवाडी या सात गावांतील एकूण 2 हजार 860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यासाठी 0.66  अब्ज घनफूट पाण्याची आवश्यकता आहे. या योजनेसाठी 38 कोटी 97 लाख एवढा खर्च येणार आहे.

कुकडी प्रकल्पात 65 बंधारे

कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कुकडी नदीवर 19, मीना नदीवर 21  आणि घोड नदीवर 25 असे एकूण 65 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधा-यांचा पाणीसाठा 2.552 टीएमसी एवढा असून, त्यानुसार  22 हजार 670 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.

हेही वाचा :

बारामतीत गट-गणांची पुनर्रचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर

भारताची निखत फायनलमध्ये

वर्दी आणि संधी

Back to top button