लालपरी’त रोज दीड लाख प्रवासी; उन्हाळी सुट्यांचा परिणाम | पुढारी

लालपरी’त रोज दीड लाख प्रवासी; उन्हाळी सुट्यांचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा
एसटी संपानंतर पहिल्यांदाच एसटीच्या पुणे विभागातील प्रवासी संख्येत वाढ झाली असून, आता उन्हाळी सुट्यांमुळे दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 40 हजारांच्या वर पोहचली आहे. संप संपल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या फक्त 60 हजार होती. शाळा, महाविद्यालये यांना मिळालेल्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा असलेला मुहूर्त त्यामुळे एसटी गाड्यांचे प्रवासी वाढले आहेत. संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले होते. त्या संपातून सावरता-सावरता एसटीच्या आता नाकीनऊ येत आहे. मात्र, असे असतानाच एसटीला उन्हाळी सुट्यांमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे मोठा दिलासा मिळत आहे.

असे वाढले एसटीचे प्रवासी व उत्पन्न

  •  संपानंतरची पुणे विभागाची दैनंदिन प्रवासी संख्या – 60 हजार
  •  त्या वेळचे उत्पन्न – 60 ते 70 लाख रुपये
  •  उन्हाळी सुट्यांमधील दैनंदिन प्रवासी संख्या – 1 लाख 40 हजार
  •  आताचे उत्पन्न – 1 कोटी 35 लाख

दक्षिण भारतात जाणार्‍या गाड्यांना गर्दी

स्वारगेट एसटी स्थानकावरून दक्षिण भारतात जाण्यासाठी एसटीच्या गाड्या सुटतात. एसटीच्या इतर ठिकाणच्या गाड्यांपेक्षा या गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी झाली आहे.
एसटीच्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्गावर गाड्यांची संख्या वाढविली आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी एसटीचा वापर करत आहेत. संपानंतर पुणे विभागाची दैनंदिन प्रवासी संख्या 60 हजार होती, आता 1 लाख 60 हजार आहे.
                                                             – ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

हेही वाचा :

Back to top button