भारताची निखत फायनलमध्ये | पुढारी

भारताची निखत फायनलमध्ये

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताची महिला बॉक्सर निखत झरीनने इस्तंबूल येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 52 किलो गटात बुधवारी फायनलमध्ये मुसंडी मारली. तर मनीषा मौनने 57 किलो गटात कांस्य पटकावले.

माजी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने ब्राझीलच्या कॅरोलिन डी एलमेडा हिच्याविरुद्धच्या लढतीत सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळविले. 52 किलो गटात तिने 5-0 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, टोकिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मनीषा मौनला इटलीच्या इरमा टेस्टाकडून 5-0 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 2019 ची एशियन चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती मनीषा दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळत होती. तिने तांत्रिकद़ृष्ट्या बलवान असलेल्या टेस्टाला आपल्या ताकदवान ठोशांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला. सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन जिंकणारी एमसी मेरीकॉम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आता या यादीत स्थान मिळविण्याची संधी निखत झरीनकडे आहे.

Back to top button