Quinton De Kock : ‘षटकारांचे शतक’ झळकावणारा डिकॉक पहिला विदेशी विकेटकीपर फलंदाज! | पुढारी

Quinton De Kock : ‘षटकारांचे शतक’ झळकावणारा डिकॉक पहिला विदेशी विकेटकीपर फलंदाज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (quinton de kock)ने ७० चेंडूत १४० धावांची नाबाद शतकी खेळी केली. यादरम्यान, त्याने १० चौकार आणि १० गगनचुंबी षटकार ठोकले. याचबरोबर त्याने आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. तो षटकारांचे शतक झळकावणारा पहिला विदेशी विकेटकीपर फलंदाज ठरला आहे.

९१ व्या सामन्यात षटकारांचे शतक पूर्ण

डी कॉकने (quinton de kock) त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ९१ वा सामना खेळताना ही कामगिरी केली. ९१ आयपीएल सामन्यांमध्ये, डी कॉकने ६ वेळा नाबाद राहताना ३२.४५ च्या सरासरीने आणि १३३.९५ च्या स्ट्राइकरेटने २,७५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत. बुधवारी KKR विरुद्ध नाबाद १४० धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानावर

डी कॉकनंतर (quinton de kock) आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याने सर्वाधिक षटकार मारले आहेत. गिलख्रिस्टने आयपीएलमध्ये एकूण ९२ षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर द. आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे. एबीडीने आयपीएलमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळताना एकूण ६१ षटकार ठोकले.

२०० हून अधिक धावा जोडणारी पहिली सलामी जोडी

बुधवारी केकेआरविरुद्ध डीकॉकने (quinton de kock) धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. यावेळी त्याने केएल राहुलसह आयपीएलमध्ये सलामीच्या भागीदारीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आयपीलच्या १५ वर्षात पहिल्यांदाच सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी २०० हून अधिक धावा जोडल्या आहेत. दोघांमध्ये २१० धावांची नाबाद भागीदारी झाली.

Navjot Singh Sidhu : सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! ३४ वर्षांपूर्वीच्‍या प्रकरणात एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

Back to top button