CM Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणार सभा | पुढारी

CM Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणार सभा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार अशी माहीती संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान त्यांनी हिंदुत्ववादी धोरणावरून होणाऱ्या आरोपांबाबतही त्‍यांनी विराेधी पक्षाला प्रतयु आक्रमक भुमिका घेत प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्रात सध्या हनुमान चालीसा मुद्यावरून राजकारण तापलेले आहे. हनुमान चालीसा पठण या हिंदुत्ववादाच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण प्राप्त झालेले आहे. शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर विरोधी पक्ष प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे. ‘भाजपला बुस्टर डोसची गरज आहे. जे नकली हिंदुत्वादी आहेत त्यांचे आव्हान वगैरे आम्हाला काही नाही’ अशी टिका राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिवसंपर्क अभियान मोहिमेचा दुसरा टप्पा आज (30 एप्रिल) पार पडला. या निमित्ताने त्यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र येथील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा

Back to top button