मुंबईत मासेमारी बोट बुडाली; खलाशाला वाचवण्यात यश | पुढारी

मुंबईत मासेमारी बोट बुडाली; खलाशाला वाचवण्यात यश

मालाड; पुढारी वृत्तसेवा: मढ येथील विजया लक्ष्मण कोळी यांच्या मालकीची मासेमारी बोट मढ किनाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आज (दिनांक ३० एप्रिल) रोजी सकाळी सुमारे ८. ३० वाजता बुडाली. सुदैवाने या बोटीच्या खलाशांना मढ पातवाडी गावातील विष्णू शिमग्या कोळी यांच्या बोटीतील कोळी बांधवांनी वाचवले आहे.खलाशाला सुखरूप वाचवल्याने मोठी जीवित हानी टळली. मात्र, बुडालेली मासेमारी बोट व मदत कार्य करणाऱ्या बोटींना समुद्रातून बाहेर काढण्‍याचे प्रयत्न सुरू आहेत.

हिरुई प्रसन्ना नोंदणी क्र. IND-MH-2-MM-6404) २५ फूट लांबीची ही बोट आहे. ही बाेट  समुद्रातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी संबंधित तटरक्षक दल, सागरी पोलीस यांनी  मदत करावे. असे आवाहन मढ दर्यादीप सोसायटीचे संतोष कोळी यांनी अस्लम शेख मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य, आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई उपनगरे, सहायक पोलिस आयुक्त, यलोगेट विभाग, मुंबई, मुख्य कार्यालय, भारतीय तटरक्षक दल, मुंबई सागरी पोलीस ठाणे-२, मुंबई ७. पोलीस उपायुक्त यांना पत्र लिहून या बोटींना बाहेर काढण्यात मदत करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : राज्यसेवा परीक्षेत बाजी मारलेल्या प्रमोदची प्रेरणादायी गोष्ट चला ऐकुया

Back to top button