पुढारी ऑनलाईन डेस्क
केजीएफ २ चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. दमदार कमाई करत अन्य चित्रपटांना त्याने मागे टाकले आहे. कन्नड सुपरस्टार यशचा हा चित्रपट केजीएफ 2 (Archana Jois) सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. केजीएफने बॉलीवूडच्या चित्रपटांनाही टक्कर दिलीय. (Archana Jois) या चित्रपटातील कलाकारही चर्चेत आहेत. चित्रपटामध्ये रॉकी भाई म्हणजेच अभिनेता यश (Yash) याची ऑनस्क्रीन आईचीही चर्चा झालीय. रॉकी भाईच्या आईची भूमिका अभिनेत्री अर्चना जोइसने साकारलीय. तुम्हाला माहितीये का ही आई रॉकीभाईपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.
अर्चना जोईस असे तिचे नाव आहे. अर्चना केजीएफमध्ये यशची रिअल आई दिसत असली तरी तिचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. वयाच्या २७ व्या वर्षी एका तरुणाच्या आईची भूमिका साकारणं, हे आव्हानात्मक हाेत; पण अर्चना जोईस हिने हे आव्हान लीलया पेललं आहे.
अर्चनाचे सोशल मीडिया हँडल पाहिले तर तिचे साधी राहणीमान दिसते. तिचा हा सिंपल अंदाज फॅन्सना मोहात पाडणारा आहे. तिचे साडीतील अनेक फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात.
अर्चना विवाहित आहे. तिने याआधी आपला वेडिंग लुक शेअर केला होता. सिंपल व्हाईट आणि रेड कलरचे कॉम्बिनेशन साऊथ इंडियन साडीत तिने ट्रॅडिशनल ज्वेलरी घातलेली होती. तिच्या या लूकवर फॅन्स कमेंट्सचा वर्षाव केला होता.
अर्चना ही एक कथ्थक डान्सर आहे. तिने अनेक डान्स शो, रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहिले तर ती डान्स परफॉर्म करतानाचे अनेक सुंदर फोटो पाहायला मिळतात. तिने Shreyas J Udupa याच्याशी विवाह केला आहे.
तिने कन्नड इंडस्ट्रीतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. महादेवी या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं. सुंदरी नावाचे पात्र तिने या मालिकेत साकारले होते.
एका मुलाखतीत अर्चनाला राम चरण, ज्युनियर एनटीआर, प्रभास आणि महेश बाबू यांच्याविषयी विचारण्यात आले होते.
रॅपिड फायर सेक्शनमद्ये तिने या स्टार्सविषयी काय सांगितले होते, पाहा-
राम चरण: उग्र
ज्युनियर एनटीआर: तो खूप खरा आहे. त्याच्या अभिनयात खूप ताकद असली तरी 'रौद्रम रणम रुधिरम'मध्ये तो मला खूप गोंडस वाटला.
प्रभास: मी 'सालार'ची आतुरतेने वाट पाहत आहे. मी त्याचे बरेच काम पाहिले आहे. प्रशांत नील सर आणि प्रभासचं कॉम्बिनेशन छान असेल.
महेश बाबू : खूप देखणा. तो विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत हे जाणून मला आश्चर्य वाटले. तो तसा अजिबात दिसत नाही.