Heatwave : उष्णतेने मोडला १२२ वर्षांचा ‘रेकॉर्ड’! देशवासियांनी एप्रिल महिन्यातच अनुभवली मे-जूनची गर्मी | पुढारी

Heatwave : उष्णतेने मोडला १२२ वर्षांचा 'रेकॉर्ड'! देशवासियांनी एप्रिल महिन्यातच अनुभवली मे-जूनची गर्मी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात यंदा मे आणि जून महिन्याची उष्णता (Heatwave) एप्रिल महिन्यातच जाणवली. मार्च महिन्यापासूनच सुरू झालेल्या उन्हाळ्याने एप्रिल महिन्यात प्रचंड रूप धारण केले. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानूसार एप्रिल महिन्यात देशाच्या मध्य तसेच उत्तर प्रश्चिम भागात नोंदवण्यात आलेले तापमान गेल्या १२२ वर्षांमध्ये सर्वाधिक होते.

विभागाने शनिवारी काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा म्हणाले, गेल्या १२२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात यंदा देशाच्या मध्य आणि उत्तर पश्चिम भागात सर्वाधिक अधिक तापमान नोंदवण्यात आले. उत्तर-पश्चिम भागात ३५.९० अंश सेल्सियस, तर मध्य भागात ३७.७८ अंश सेल्सियस तापमानाची नोद घेण्यात आली.

हवामान खात्यानुसार यंदा देशातील बहुतांश भागत सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि पूर्वोत्तरच्या काही भागांना वगळता देशातील बहुतांश भागातील पाऊस सामान्य तसेच त्याहून अधिक राहण्याची शक्यता डॉ. मोहपात्रा यांनी वर्तवली आहे.

यापूर्वी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिना इतिहासातील सर्वात उष्ण महिना (Heatwave) ठरला. दिल्ली, चंद्रपार, जम्मू, धर्मशाला, पटियाला, डेहराडून, ग्वाल्हेर, कोटा, पुणे या भागांत उच्च तापमानाची नोंद झाली. पश्चिम हिमालयात असलेल्या ‘हिल स्टेशन’मधील तापमान सामान्यपेक्षा ७ ते ११ अंशानी जास्त नोंदवण्यात आले. डेहराडून, धर्मशाला आणि जम्मूमध्ये तापमान ३४ ते ३५ अंश नोंदवण्यात आले.

विशेष म्हणजे मार्च २०२२ मध्ये कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे ३३.१ अंश सेल्सियस, २०.२४ अंश सेल्सियस आणि २६.६७ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. या तापमानाची १९८१-२०१० या वर्षाशी तुलना केली तर अधिक नोंदवण्यात आली आहे. या वर्षाते हे तापमान ३१.२४ अंश सेल्सियस, १८.८७ अंश सेल्सियस आणि २५.०६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

हे ही वाचा :

Back to top button