विमाननगर येथील विक फील्ड इमारतीमधील बजाज फायनान्स कंपनीत चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्स पुरविणार्या व्यक्तीकडे माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी उकळणार्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले. इफराज फिरोज शेख (वय 30, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) आणि तुषार विष्णू आढवडे (वय 36, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.