पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून काचेने गळा चिरला! | पुढारी

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून काचेने गळा चिरला!

पुणे, धायरी : पुढारी वृत्तसेवा

शिवीगाळ केल्याच्या रागातून नर्‍हे येथील व्यसनमुक्ती केंद्रात गुरुवारी पहाटे एकाने त्याच्या सहकार्‍याचा काचेने गळा चिरुण निर्घृण खून केला. तो गळा कापत असताना इतर सहकारी जागे झाले, मात्र रक्ताचे पाट वाहताना बघुन सर्व जागेवरच स्तब्ध झाले होते. गळ्यावर वार केल्यानंतर माथेफिरूने त्या व्यक्तीच्या नरड्यात बोटे घालून तो फाडला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नेचरेस बिल्डिंग अभिनव कॉलेज रोड नर्‍हे येथील न्यास व्यसनमुक्ती केंद्रात गुरूवारी (दि.21) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

जम्मूमध्ये भीषण चकमक; ४ दहशतवादी ठार, तर १ जवान शहीद

अरुण मोहन राठी (वय. 65, रा. अनुबंध सोसायटी सिंहगडरोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी संकेत सुनिल अल्हाट (वय. 24, रा. स्वामी नारायण मंदीराच्या मागे नर्‍हे) याला अटक केली आहे. याबाबत एका 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्हाट याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

शिवीगाळ केल्याचा राग आल्याने केले कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यसनमुक्ती केंद्र नर्हे येथील एका निवासी इमारतीत आहे. तेथे वेगवेगळ्या सदनिकांमध्ये सुमारे 45 व्यक्ती उपचार घेत आहे. यातील एका सदनिकेत उपचार घेणारे बारा जण रहात होते. 16 एप्रिल रोजी आल्हाट याचा वाढदिवस होता. त्या दिवशी घरातील कोणी त्याला भेटायला आले नव्हते. त्यामुळे तो तणावात असताना, राठी हे त्याला शिवीगाळ करत होते. त्याचा राग आल्हाट याच्या मनात होता.

नवाब मलिकांना आणखी एक दणका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

गुरुवारी रात्री राठी गाढ झोपले होते. मात्र आल्हाट साडेतीनच्या सुमारास जागा झाला. तो थेट राठी झोपलेल्या ठिकाणी गेला. राठी गाढ झोपेत असताना, त्याच्या तोंडावर टॉवेल ठेवला. यानंतर काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. राठी जिवाच्या अकांताने ओरडत असताना इतर सहकारी जागे झाले. मात्र आल्हाट याचा आवेश आणि राठी याच्या गळ्यातून वाहणार्‍या रक्ताच्या धारांमुळे सगळेच जागीच स्तब्ध झाले. राठी तडफडून मेल्यावर, आल्हाट शांत होऊन स्वत:च्या जागेवर गेला.

नाशिक : अखेर म्हाडाच्या 2000 सदनिकांचे दरवाजे खुले! ; जितेंद्र आव्हाड स्वत:च लिलाव करणार

राठी हा फेब्रुवारी महिन्यात उपचारासाठी दाखल होता, तर आल्हाट हा ऑगस्ट महिन्यात दाखल झाला होता. दोघांनाही दारुचे व्यसन होते. तेथील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राठी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

Back to top button