IPL 2022 : रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

IPL 2022 : रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये काल सर्वांचे लक्ष लागून असलेल्या चेन्नई वि. मुंबई सामन्यांत चेन्नईने चित्तथरारक विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर विजय संपादन केला. मुंबई आणि चेन्नई या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये काल झालेल्या सामन्यात काल रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने रोहित शर्माला बाद केले. (IPL 2022)

कालच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला आहे. तो आयपीएलमध्ये १४ वेळेस शून्यावर बाद झाला आहे. याअगोदर आयपीएलमध्ये पीयूष चावला, मनदीप सिंह, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू हे फलंदाज यापुर्वी १३ वेळेस शून्यावर बाद झाले होते. तर दिनेश कार्तिक, मनिष पांडे, गौतम गंभीर हे १२ वेळेस शून्यावर बाद झाले आहेत. (IPL 2022)

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सला काल सलग सातव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला अजूनही फॉर्म गवसलेला नाही. सुर्यकुमार यादव शिवाय मुंबई इंडियन्सकडून कोणीही चांगली कामगिरी करू शकलेले नाही. कायरन पोलार्ड, ईशान किशनही आपल्या फॉर्मशी झुंजत आहेत. मुंबई इंडियन्स आपला पहिला विजय कधी मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (IPL 2022)

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news