एसटी संपानंतर पहिल्यांदाच एसटीच्या पुणे विभागातील प्रवासी संख्येत वाढ झाली असून, आता उन्हाळी सुट्यांमुळे दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 40 हजारांच्या वर पोहचली आहे. संप संपल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या फक्त 60 हजार होती. शाळा, महाविद्यालये यांना मिळालेल्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा असलेला मुहूर्त त्यामुळे एसटी गाड्यांचे प्रवासी वाढले आहेत. संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले होते. त्या संपातून सावरता-सावरता एसटीच्या आता नाकीनऊ येत आहे. मात्र, असे असतानाच एसटीला उन्हाळी सुट्यांमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे मोठा दिलासा मिळत आहे.